ज्यांच्यामुळे..
मनी आनंद लहरी, सुखद क्षणांच्याही सरी,
मनोविश्व माझे बहरी, नाती तीच !!
ज्यांच्यामुळे..
मनी फुलतो वसंत,समाधानही अनंत,
माझे क्षण शोभिवंत, नाती तीच !
ज्यांच्याकरिता..
मन कल्पिते नवनवे, शोधी भेट प्रयोजने,
आठवांनी भरू पावे, नाती तीच !
ज्यांच्यामुळे..
चढे कळस कतृत्वास, बहर नवे व्यक्तित्वास,
वाढी लागे आत्मविश्वास, नाती तीच !
ज्यांच्यासंगे..
आपल्या विचारांचा सन्मान, आवडी निवडीचाही मान,
व्यक्तिस्वातंत्र्याचे ही भान, नाती तीच !
ज्यांच्या सोबतीचा..
मज वाटतो हव्यास, मनी आठवांचा सुवास,
मज हृदयामध्ये वास, नाती तीच !
माझ्यासाठी..
अशी कित्येक भवती, मनःचक्षू ही बघती,
मना रुजती, वाढती, नाती तीच !


Leave a comment