।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


माता सरस्वती… : सौ. स्मिता देशपांडे

जागतिक कविता दिनानिमित्त…. (२१ मार्च ) केलेली रचना


माता सरस्वती…

 

हे माते, सरस्वती शारदे,

वरदायिनी, तू वर दे !

 

कुंदसुमन शुभ्रवस्त्र धारिणी

विधुबिंब शोभते प्रसन्न वदनी

तेजस्विनी करि मौक्तिक मणी

वीणावादिनी सौंदर्यखणी

कमलविलासिनी विमल मती दे

वरदायिनी, तू वर दे !

 

ब्रम्हानंदिनी, जगदोद्धारिणी,

सकल कलांची तू अधिकारिणी

कणकण व्यापि विश्र्वजननी,

वंदन करिते तुझिया चरणी

बुद्धीदायिनी सद्बुद्धी दे

वरदायिनी, तू वर दे !

 

अर्थपूर्ण शब्दांची खाण दे

सूर ताल लय श्रुती ज्ञान दे

वाग्विलासिनी सतत साथ दे

तम सारूनी द्युती दान दे

ज्ञानदायिनी, विद्यादायिनी

वरदायिनी, तू वर दे !

 

हे माते,सरस्वती शारदे,

वरदायिनी, तू वर दे !

 

सौ. स्मिता देशपांडे .


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment