।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १: पठाणमामू : : श्री. बलबीर अधिकारी

लेखांक १: पठाणमामू

      त्याचे खरे नाव काय होते ते माहित नाही. सारेजण त्याला पठाणमामू म्हणत. आम्हीहीतेच नाव वापरत असू. खरे नाव माहीत करून घेण्याची वेळ वा गरज कधी पडलीच नाही. नामपूरगावात चार फाट्यावर एका झोपडीवजा घरात मामूचा संसार होता. स्वत: व्यवसायाने गवंडी असूनही त्याने आपल्या घराची वीट कधी सरळ रेषेत बसवली नाही. ओळंब्याचावापर करणे त्याला जणू कधी जमलेच नाही, पणत्यामुळे त्याचे कधी अडले आहे, असेही कधी दिसले नाही.

      मामूचा गोतावळा बराच मोठा होता. गावातत्याचा भाऊ आणि त्याचा परिवार बहाद्दर म्हणून प्रसिद्ध होता. पुरानेवेढलेल्या नदीत उतरणे, कोणाच्याघरात साप घुसला असेल तर तो हुसकणे वा मारणे, खोलबारवेत उतरून तळाची चीजवस्तू काढून देणे यात त्याचा हातखंडा होता. कदाचितत्यामुळेच तो लोकांना हवाहवासा वाटत होता. त्यालाहीअसे कलंदराचे जीवन प्यारे असावे, असेत्याच्या एकंदर वागण्याबोलण्यातजाणवत होते. मामूमनस्वी जीवन जगत होता.

      मनस्वी स्वभावामुळेच मामूने एक दिवस आपल्या भाईबंदाना आवडणारीगोष्ट केली. त्यानेचक्क प्रेमविवाह केला. गावच्याचपरिसरात असणार्याभिल्ल वस्तीतील राबिया नावाच्या तरूणीने त्याच्या मनात घर केले होते. दिसायलासाधारण, सावळ्या वर्णाची राबिया नवीन लुगडे पडशीअंगावर ओढत पठाणमामूबरोबर मोमिनवाड्यात आल्याचे पाहून सार्यांनीगिल्ला केला. मामूलाधमक्या दिल्या. गावातूनबाहेर काढण्याबद्दल सुनावले, पणपठाणमामू सच्चा होता. मोठ्यादिलाचा होता. तिच्यासाठीत्याने सारा गोतावळा सोडला, पणअखेरपर्यंत तिला अंतर दिले नाही. त्याचापरिणाम म्हणूनच गावाच्या चार फाट्यावर त्याला झोपडीत संसार मांडावा लागला. पठाणमामू राबियाला आपले अपत्य नव्हते, पणगांवातील सारी मुले त्याच्या झोपडीत खेळत. बकर्या, कोंबड्या, म्हैस, यांच्याबरोबरमुलांचा वेळ चांगला जाई. खाटेवर मामू चिलीम ओढत बसलेला आणि राबिया घरकाम करताना दिसे. आलागेला मामूला हाक देई. तेव्हा मामू उठण्याचे कष्ट घेताआतूनच उत्तर देत असे. चंद्रमौळी घरामुळे आतबाहेर असे काही नसायचंच. दरदिवाळीला आणि राखीला आईकडून तो ओवाळून घ्यायचा. आईहीनाते जपायची. जमेलते गोडधोड त्यांच्यापुढे ठेवायची अन् दुखले खुपले पाहायची. अशीनाती शेजारधर्माला उन्नत स्वरूप प्राप्त करून देत असायची. बघणारालाहीबरे वाटायचे. गावातएक बरे असते. रीतिभातीसोडल्या तर सारी माणसेमाणसेचअसतात. त्यात कुणी हिंदू, कुणीमुसलमान, कुणी बाई, कुणी पुरूष असा भेद नसतो. सारेरोखठोक असते. मनातएक, ओठात एक अशी द्विधा वा लेचीपेची प्रवृत्ती नसते. प्रेमहीखरे असते आणि वैरही खरेच असते. तेपरिणामाची विशेष पर्वा करीत नाही. पठाणमामूनेतर कधीच ती केली नाही.

      परिणामांची पर्वा करणार्या पठाणमामूला गांवातल्या सर्वच मुलांचा कळवळा असे. गांवातील आठवडे बाजारच्या दिवशी सारी पोरे मामूच्या भोवती धिंगाणा घालत. त्यांचेमनोगत त्याच्या ध्यानी येई. राबिया कधी त्याला डाफरत असे, पण तो तिला जुमानत नसे. कधी भेळभत्ता, कधीटरबूज, कधी आंबे, कधीपपया विकत घेऊन तो मुलांसमोर ठेवी त्यांच्याकडेपाहात तो मुलांना खाऊ भरवीत असे. कधी मुलांसाठी तो असा खाऊ स्वत: घेऊनयेई. शाळेत जाताना मधल्यासुटीत काहीबाही लागले तर मामूचा खिसा हमखास मोकळा सापडे अन् मुलांच्या चेहर्यावरच्यास्मितरेषा मामूला सुखावून जात.

      1969 साली महापूर आल्याने गावात मातीच्या घरांची  पडझड झाली. त्यातआमचेही घर होते. संसारउघड्यावर आला होता. मामूगवंडी होता. त्याच्याकडेगरजूंची रीघ लागली. हाताखालीकामाला माणूस मिळेना. घराचेखांब आणि छत उभे करण्यासाठी मातीच्याविटा तयार करण्यासाठी माणूसबळ हवे होते. आम्हीघरातल्या मुलांनीच मामूला साथ द्यायचे ठरवले. मामूनेचार पैसे मिळण्याचे साधन सोडून बहिणीचे घर उभे करायला घेतले आणि आठवड्यात जसे होते तसे करून दिले. मोबदल्याचीबात करताच तो उसळून म्हणाला होता.”आप क्या दोगे? पैसा ? कीमत करोगे मेरे काम की ? छोटेहोछोड दता हूँपर आइंदा ऐसी बात करनाबडा धक्का लगता है.”

      आम्ही त्याच्या गरजेविषयी बोललो, पणमामू आपल्या शब्दावर ठाम होता. तोम्हणाला, “यह घर मेरा अपना है. जो चाहे ले लूँगा. परइस तरह नहीं, ऐसेसमय भी मैं काम आयातो कब आऊंगा ?”

      खरे पाहता मामू मुलांच्या कामी अनेकवेळा येत असे. जणू त्याने त्यांना दत्तकच घेतले होते. मुलांच्याशिक्षणासाठी कपडालत्ता, पुस्तके, फी यात त्याचा हात असे, प्रसंगी तो आपल्या कोंबड्या बकर्या विकत असे. ते पाहून कधी अवघडल्यासारखे वाटले तर, “अरे, उसके लिए तो रखा था उनको ?” असेम्हणून हसण्यावारी सारे नेत असे. किरकोळ दुखणे जास्त होऊन राबिया सोडून गेल्यानंतर पठाणमामू एकटा पडला. एव्हानामुलेही मोठी होऊन आपआपल्या व्यवसायात अडकली होती. तथापिगावी गेल्यावर मामूकडे उठबस चालूच होती. तोहीआता थकला होता.मधूनमधून तो आजारी पडे. कधी जास्त झाल्यावर सार्यांनाबोलावून घेई. निरवानिरवीचे बोलत असे. आम्हाला ते सारे असह्य होत असे. कारण उत्साही कार्यमग्नअसणार्या परोपकाराच्यापायघड्या घालणार्यापठाणमामूचे असे दर्शन त्रासदायक असे, पण सार्यांचेचसगळे दिवस सारखे नसतात. आपल्यालाआठवण असो वा नसो काळ आपले काम करीतच असतो. अशाचएका दिवसाने मामूची जीवनयात्रा संपवली.

      आजही एस.टी. ने गावी जाताना जेव्हा नामपूरच्या चार फाट्यावर मी उतरतो तेव्हा उजवीकडे वळून पाहतो. जेथेमामूची झोपडी होती तिथे आता हॉटेल उभे आहे. पण मला मात्र ती झोपडीच दिसते आणि खाटेवर मामू बसलेला दिसतो. तोमला साद घालील असे वाटते, पणहाक आल्यामुळेमी हातातली पिशवी सावरत घराकडे पाऊल टाकतो. थोडेथबकून पाठीमागे माझी नजर जाते तेव्हा तिथे काहीच दिसत नाही. मामूआणि झोपडीदोन्हीआता दिसणारच नाहीत. मनातलेकधी जेव्हा बाहेर दिसू लागेल तेव्हा कदाचित मला पठाणमामूला भेटण्याचा योग येईल. अन् त्यापाठी शब्दही येतील. “आओ बेटा. कहो, कैसे हो ?”


 श्री. बलबीर अधिकारी  


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment