SWS चे राैप्य महाेत्सवी वर्ष साजरे करत असतांना, आमच्या संस्थेमार्फत गेल्या २५ वर्षात झालेल्या अनेक सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. सुरवात अर्थातच अगदी छाेट्या स्वरुपात हाेती – ‘।।अल्पारंभ: क्षेमकरा ।।‘ या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे ! राैप्य महाेत्सवी वर्षात या सामाजिक कार्याला संघटित स्वरूप द्यावे व स्वतंत्र संस्थेमार्फतच हे काम करावे – म्हणजे अधिक संघटितरित्या आणि परिणामकारक स्वरूपात कार्य पुढे नेता येईल हा विचार पुढे आला. अनेक हितचिंतक, समविचारी सहकारी व मित्रपरीवाराने ही संकल्पना उचलून धरली व उत्स्फुर्तपणे काम करण्याची तयारी दर्शविली. ब्रीदवाक्याचा वापर करूनच या नवोदित संस्थेचे नाव ठरवावे असे सर्वानुमते ठरले आणि ‘अप्लारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन’ चा उदय झाला !
संस्थेची प्राथमिक उद्दिष्ट्ये ठरवितांना, अर्थातच समाजावर प्राथमिक परिणाम करणारी, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्र ही प्रामुख्याने विचारात घेतली गेली. या दोन्ही विषयांच्या कक्षेत कार्य करतांना, त्यातील विविध निकडी ओळखून, त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मदत करणे आणि त्या निगडीत उपक्रम राबवणे हे अप्लारंभाचे प्राथमिक उद्दिष्ट्य आहे. आर्थिक साक्षरतेसाठी उपक्रम राबविणे, समाजातील दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या संस्थांना मदत करणे हे ही सामायिक ध्येय समोर ठेऊन कामाला सुरवात केलेलीच आहे. आपणही अप्लारंभाच्या कार्यास प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष सहकार्य करावे. सुरुवात जरी अल्प दिसत असली, तरी ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे‘ उक्ती ला जागून, भव्य-परिणाम साधण्यासाठी, कार्यमग्न होऊयात !!
अप्लारंभाविषयी अधिक माहिती: www. alparambha.com , ई-मेल:alparambha@gmail.com , दुरध्वनी: ९०११८९६६८१


Leave a comment