।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


SWS – ३१ वर्षांचा प्रवास

एकतीस वर्षांचा प्रवास.. खेळ नाही केवळ आकड्यांचा,
एक संपन्न कालखंड हा.. जोडल्या गेलेल्या नात्यांचा !
ग्राहकांच्या विश्वासाचा, अखंड तेवतो नंदादीप,
हजार कोटींचा टप्पा गाठत, यश आले आणखी समीप !!

तंत्रज्ञानाच्या वेगात आणि AI च्या नवयुगात,
ग्राहकांचा विश्वास स्थिर, अजूनही प्रत्येक क्षणात !
GPT आणि अँप्स द्वारे, जरी सर्व माहिती तुमच्या हातात,
तरीही निर्णय घ्यायला लागतोय, आपल्या माणसांचाच आधार !!

कारण केवळ आकडे म्हणजे, नसते धनाचे नियोजन,
ग्राहकांच्या भावनांची, त्यात असते नाजूक गुंफण !
म्हणून SWS चा सल्लागार, नाही केवळ एक व्यावसायिक,
तो तर तुमच्या कुटुंबाचा, एक सहृदय मित्र सामायिक !

बाजाराच्या चढ-उतारात, नेहमी शांत पाठिंब्याची साथ,
धीर देणारा.. दिशा दाखवणारा, SWS चा आश्वस्त हात !
कौश्यल्याच्या आधारावर, इथला प्रत्येक निर्णय बेतलेला,
ग्राहकांच्या समाधानास्तव, हरएक क्षण वेचलेला !!

SWS ची सज्ज टीम, अचुकतेचा सदैव ध्यास,
अचूक, तत्पर सेवेमुळे, दृढ होतोय परस्पर विश्वास !
‘ग्राहक प्रथम’ ठेवणारा , इथे टीमचा प्रत्येकजण,
कामाच्या ढीगातही जपतोय, प्रत्येक ग्राहकाचे मन !!

उत्तम मूल्यांच्या आधारे, चढता आलेख प्रगतीचा,
कठीण समयीही लावला, पहिला निकष नीतीचा !
निःसंशय मग गाठला, नवा पडाव प्रगतीचा,
अशी व्यक्तीत्वे असता येथे, घडा वाहतो कीर्तीचा !!

सामाजिक दायित्वाची, केली जाते उत्तम जपणूक,
अल्पारंभाच्या कार्याची, जाणवते सदा उबदार झुळूक.
संस्कृती, शिक्षण, प्रचार-प्रसार.. घेतला इथे यांचा ध्यास,
‘सर्वंकष प्रगती’ चे, SWS चे ध्येय खास !

या वर्धापनदिनी करू एकच हा संकल्प नवा,
मने जोडणारा सेतू बांधू, हा नित्य निर्धार हवा.
एकतीस वर्षे पूर्ण झालीत, प्रगतीस येवो आता भरती,
विश्वासाच्या बळावर, पुढील दौड हो झंझावाती !!
सहकार्याच्या बळावर, पुढील दौड हो झंझावाती !!


-सौ. रुपाली दिपक कुलकर्णी


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१